जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सोलापूर

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (डायट) सोलापूर या संस्थेची ओळख करून देताना आनंद होत आहे . राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र , पुणे (विद्या प्राधिकरण) या शिखर संस्थेच्या सनियंत्रणाखाली व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र पुणे , शिक्षण संचालनालय महाराष्ट्र पुणे ,एम पी एस पी मुंबई ,बालभारती पुणे, राज्य विज्ञान संस्था नागपूर, आंग्ल भाषा संस्था,छत्रपती संभाजीनगर, मिपा छत्रपती संभाजीनगर यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा स्तरावरील विविध शासकीय कार्यालयांच्या समन्वयाने व सहकार्याने मुलांचे शिक्षण अखंड चालू राहण्यासाठी शाळा, शिक्षक, पर्यवेक्षण यंत्रणा, पालक यांना विविध शासकीय योजना व वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त उपक्रमांच्या माध्यमातून मूलभूत मार्गदर्शन करण्याचे कार्य करत असते.

या अंतर्गत विविध कार्यशाळा, प्रशिक्षणे, अध्ययन स्तर अंमलबजावणी, सर्वेक्षण, विज्ञान प्रदर्शन, नवभारत साक्षरता अभियान, आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, विद्यार्थीविषयक उपक्रम, मुलींचे शिक्षण, करिअर मार्गदर्शन, मूल्यमापन, सेवापूर्व शिक्षक शिक्षण, सेवांतर्गत शिक्षण याबाबत कार्यालयातील अधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील विविध स्तरातील तज्ञ शिक्षक व प्राथमिक ,माध्यमिक, योजना शिक्षणाधिकारी कार्यालय, गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांचे कडील पर्यवेक्षण यंत्रणेच्या सहकार्याने माहिती, मार्गदर्शन व प्रेरणा देण्याचे काम करत असते.

Mr. Jitendra Salunkhe Principal, DIET Solapur

Scroll to Top